Showing posts with label marathi pj. Show all posts
Showing posts with label marathi pj. Show all posts

Friday, March 18, 2011

Marathi PJ




आत्महत्येचे दोन मार्ग 
झटपट आत्महत्या : एक मोठा दोर घ्या . गळ्यात अडकवा . छताला लटका ! .
.
.
.
....
.
.
.
.
.
.
.
.
.
.... रमतगमत आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या . ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा !!!

-------------------------------------------------------------------

शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास 
ठेवला , पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो .

-------------------------------------------------------------------

प्रपोज करण्याची नवीन पद्धत . मिकू : तुझं नाव गूगल आहे का ? चिंकी : नाही .. का ? मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं ....

---------------------------------------------------------------------




टीचर : या ओळीचे इंग्लिशमध्ये भाषांतर करा .






‘ त्याने त्याचे काम केले आणि 
तो ते करतच राहिला . ’


संता : ही डन हिज वर्क अँड डन डना डन डन डना डन ...


---------------------------------------------------------------------------






सगळ्या अमेरिकन मुलांची नाव , जॅकसन 
विलसन 
मार्कसन 
रोबिनसन 
केनसन 
जॉनसन 
डेविडसन 
जेमसन 
सॅमसन 
अशी का असतात ? कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते .


-------------------------------------------------------------------------









एकदा एक ‘ पाटील ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता ..


बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू ....


पाटील : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head &
shoulder आहे .......










Saturday, January 22, 2011

Marathi PJ


1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच  उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो....

सुविचार
१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं



Thursday, July 2, 2009

Marathi PJ - Mahima 2 minitancha

अमित, मी पंडित काकुंकडे चालली आहे. दोन मिनिटात येत्ये! तेवढ्यात दूध वर आले तर गॅस बंदकर!" असे सांगून आई गप्पा मारायला गेली, तिचा दोन तास झाले तरी पत्ता नाही. आमच्याकडे हेअसे नेहमी घडते. आईचे दोन मिनीट कधी संपतच नाहीत.
"केवढा वेळ लागला तुला!" ती परतआल्यावर मी नाराजीने म्हणालो.
"अरे त्याना लग्नात मिळालेल्या साड्या दाखवत बसल्या त्या. बराचवेळ गेला त्यात". एकूण आपल्या लोकाना वेळेची काही किम्मत नाही. मी व्यथीत झालो. आपलादेश कधी सुधारणार? छे! दोन मिनिटे म्हणे! मराठीत "दोन मिनिटे" हे नुसते दोन शब्द नसून तोएक वक्प्रचार आहे. ह्याचा अर्थ "मला कितीही
वेळ लागू शकतो" असा समजावा. दोन मिनिट असेम्हणून दोन मिनिटात होणारी एकच गोष्ट मला ठाऊक आहे.
ती म्हणजे म्यागी नूडल्स. मी ठरवले कीह्या वाक्प्रचारावर मौलिक संशोधन करावे. म्हणजे ह्याचा पहिला प्रयोग कुठे झाला? त्यानंतर तो कोणीकोणी आणि किती किती वेळा वापरला ई. त्यातून मला अतीशय धक्कादायक माहिती मिळाली. ती१००% खरी आहे.
"दोन मिनिट" ह्याचा सर्वप्रथम उपयोग रामायणात झाल्याचा दाखला आहे. तो प्रसंग असा.
"अहो! तो सुवर्णमृग काय छान आहे ना! मला त्याच्या चामड्याची चोळी पाहिजे बाई! आणा कीत्याला पकडून!" सीता.
"तुला काय करायची ही असली चोळी? आपण बरे आणि आपली वल्कले बरी!" राम (तो त्यावेळीअयोध्याटाईम्स वाचत होता.) "सारखं मेलं ते पेपर वाचत असता". सीता.
"आता अरण्यात अजून काय करणार?" राम.
"हुं! लग्नाच्या आधी मारे शिवधनुष्य तोडलंत. आता मेलं एक हरीण नाही मारता येत!" सीतारागावून म्हणाली.
"काय कटकट आहे!" असे म्हणून राम उठला आणि लक्ष्मणाला म्हणाला "जरा पर्णकुटीचे संरक्षणकर. मी आलोच दोन मिनिटात" अशा पद्धतीने तो सुवर्णमृगाची शिकार करायला बाहेर पडला.त्यापुढील रामायण सर्वाना माहीत आहेच.
ह्याचा लिखित पुरावा आहे आमचाकडे. गरजूनी पडताळून पहावा. (आम्ही मी चे आम्ही झालो हासूक्ष्म फरक चाणाक्ष वाचकानी ओळखला असेलच. वाङमयीन संशोधक मी नसून आम्ही असाशब्दप्रयोग करतात त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे वजन वाढते असा साहित्यिक समज आहे. हा कितपतखरा आहे ह्यावर आम्ही पुढचे संशोधन करणार आहोत. पण तोपर्यंत आम्ही हा शब्दप्रयोग करण्यासहरकत नसावी).
महाभारतातही लोक "दोन मिनिट" हा वाक्प्रचार वापरत होते ह्याचा दाखला आहे आमच्याकडे. आर्थातत्याचाही पुरावा आहे आमच्याकडे. तो प्रसंग पुढीलप्रमाणे.
"धर्म्या! द्यूत खेळायचा काय?" दुर्योधन.
"नको रे बाबा! खूप टाईमपास होतो. द्रौपदी चिडेल" युधिष्ठीर.
"काय राव! बायकोला किती घाबरतोस? तिला पणावर लावायला नाही सांगितले तुला. दोन तीन डावखेळू. चल ना दोन मिनिटे खेळू फक्त! ठीक आहे?"
"दोनच मिनिटे. ठीक आहे! भीम, अर्जुन, नकुल, सहदेव....चला दोन मिनिटे द्यूत खेळूया!"
ह्या दोन मिनिटामुळे पुढचे महाभारत घडले.
(स्थळ: कुरुक्षेत्र)
"अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण.
"दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन.
(अर्ध्या तासाने)
"अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण.
"दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन.
"दोन मिनीट, दोन मिनीट म्हणून अजून किती वेळ घालवणार आहेस? युद्ध करणे हे तुझे कर्तव्यआहे. थांब लेका! तुला आता गीतोपदेश केलाच पाहिजे"
"दोन मिनिट" चा शिवकालीन संदर्भ हा असा.
(स्थळ: अग्रा)
"अबे गफूर! सुट्टा है क्य?"
"अभी टाईम नही है।"
"क्या हुआ?"
"वोह शिवाजी है ना! उसको बंदी बनाया हैं| उसके छावणीके आगे पहारा कर रहा हूँ!"
"वोह कहाँ भागे जा रहा हैं?"
"अरे बाबा! ये देखो! ये मिठाई का बॉक्स चेक करना हैं।"
"अरे जाने दो यार! अब तक एक भी बक्सेसे कुछ मिला है क्या? उसकी तबियत खराब हैं। साधूलोगोंको मिठाई भेज रह है बेचारा। कायकू टेंशन लेता हैं? दो मिनिट में सुट्टा मार के आते हैं।चल।"
पेशवेकालीन संदर्भ हा असा.
"हे काय लिहित आहात?" आनंदीबाई.
"नारायणरावास धरावे असा गारद्याना खलिता पाठवत आहे" रघुनाथराव.
"अगं बाई! पैठणीच्या निर्‍या अगदी अत्ताच सुटायला हव्या का? अहो जरा तिकडे पहा ना!"आनंदीबाई.
"तिकडे पहायची काय गरज आहे? आम्ही कोणी परके का आहोत?" रघुनाथराव.
"काय बाई चावटपणा अंगात आहे? पेशव्यांचे काका आहात तुम्ही. शोभत नाहीत ही असली वागणी!जरा बघा ना तिकडे!! फक्त दोन मिनिट!! प्लीज!!"
आणि अशा पद्धतीने "ध" चा 'मा" झाला.
(जेवणाची पाने मांडली असताना)
"काका मला वाचवा!!" नारायणराव.
"दोन मिनिट! जरा धोतर सावरून येतो" रघुनाथराव.
"काका मला वाचवा!" नारायणराव.
"आयला! ही न सुटणारी धोतरं कुठे मिळतात कुणास ठाऊक!"रघुनाथराव.
"काका मला वाचवा" नारायणराव.
"अरे! अलोच! दोन मिनिट थांब!" रघुनाथराव.
"आ आ आ आ ई ई ई ई! मेलो मेलो" नारायणराव.
पुढील संदर्भांचा काळ सांगण्याची गरज नाही. वाचकाना तो समजेलच.
(आम्हाला माहीत नाही असेनाही. पण आम्हीच सगळे सांगितले तर वाचकानांमध्ये संशोधनाची आवड कशी निर्माण होणार? म्हणूनमुद्दामच काळ सांगितला नाही. असो!).
(प्रसंग पहिला.)
"अरे न्यूटन! त्या सफरचंदाच्या झाडाखाली अजून किती वेळ बसणार आहेस? चल घरी!"
"अलोच! दोन मिनिट! तू हो पुढे!"